खान्देश ची शान सारंगखेडा घोडा बाजार | India's Biggest horse market
भारत मधील सगळ्यात मोठा सारंगखेडा घोडेबाजार आहे.
शहादा-धुळे रस्त्यावर, खान्देशी ची शान असलेले गुजरातच्या सीमेपासून केवळ शंभर कि.मी. वर, ताप्ती नदीच्या काठावर एक सारंगखेडा नावाचे गाव आहे,या सारंगखेडा ची यात्रा पूर्ण भारतात घोडाबाजार साठी प्रसिद्ध आहे इथे संपूर्ण भारतातून अश्व प्रेमी आणि अश्व व्यापारी येत असतात,हे मध्ययुगीन काळापासून वसलेले गाव आहे.या गावचे नाव श्रीकृष्ण चा घोडा सारंग या वरून या गावाचे नाव सारंगखेडा पडले आहे.
पुरातन काळापासून राजपूत - मराठा-जाट-शीख - येथील मुघल शासक मध्ययुगीन काळात घोडेस खरेदी करत होते; प्राचीन काळापासून येथे एकमुखी दत्त स्वामी मंदिर आहे.याच श्री दत्ता स्वामी जयंतीच्या निमित्ताने दर वर्षी एक सुंदर मेळावा आयोजित करण्यात येतो.या दत्त स्वामी मंदिर ची आख्यायिका अशी सांगितली जाते की शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील नंदा मक्कान पाटील यांना स्वप्नात दत्त स्वामी नि साक्षात्कार दिला आणि सारंगखेडा या गावी मंदिर मंदिर उभे करावे असे सांगितले.साडे तीनशे वर्षा पूर्वी नंदा पाटील यांनी एकमुखी दताची स्थापना करून छोटे मंदिर बांधले होते.कालांतराने ग्रामस्थांनी मंदिर ट्रस्ट उभारून लोकवगणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला. नंदा पाटील हे वारकरी संप्रदायाचे व महानुभाव पंथाचे असल्याने आज ही मंदिर ट्रस्ट चा कार्यकारणीमध्ये सर्व सदस्य महानुभाव पंथाचे आहेत.अनेक भाविक या यात्रेत नवस भेडण्या साठी यात्रेमध्ये सहभागी होतात.या मंदिराच्या समोरच देशातील सगड्यात मोठा घोडा बाजार येथे प्रत्येक वर्षी दत्त जयंती 3 dec पासून भरत असतो. ही जत्रा पूर्ण महिना चालू असते,हे स्थान संपूर्ण जगभरातील विविध जातींचे घोड्यांसाठी प्रसिध्द आहे. प्राचीन काळापासून भारतातील राजा-महाराजा; सर्वोच घोड्याचा खरेदीसाठी रथी-महारथी येथे भेट देत असत. आजही, देशाच्या विविध भागांतून घोड्याच्या व्यापारी येथे येतात.
यात्रे मधील घोड्या मध्ये देवमान,कंठळ,जयमंगल,शामकर्ण,काळा, पाच कल्याणी ये गुणवान घोडे सर्वात जास्त प्रमाणावर अश्वप्रेमी खरेदी करतात,जर घोड्याचा नाकावर पांढरे चट्टे,दोन भवरी असलेले,पोटा खाली भावरा असलेले,गळ्यावर भवरा असलेले घोडे अश्वप्रेमी नाकारतात.
Saragkheda chetak festival 2017
sarangkheda, horse market Special show, horse, horse market, sarangkheda horse market, Nandurbar : Sarangkheda horse market, MPs Chetak horse price Rs 1 Crore 21 lakh, सारंगखेडा घोडा बाजार 2017, india biggest horse market, biggest horse market, Chetak Festival, Chetak Festival Nandurbar, Chetak Festival Sarangkheda, Randeep Hooda Horse, Horse Racing, Bollywood Actors Love horse, Warli Horse Race course, Mahalxami Horse Race course
Comments
Post a Comment